Description
स्त्रियांच्या कवितांचा अभ्यास हा एका परीने संपूर्ण समाजाचा आणि संस्कृतीचाच अभ्यास असतो. मराठी भाषेत गेल्या सातशे वर्षांच्या काळात स्त्रिया कवितेतून स्वतःला व्यक्त करीत आहेत. या सातशे वर्षांच्या काळातल्या स्त्रियांचे सारे जग, त्यांच्या भोवतीचे वास्तव, त्यांचे पुरुषांशी व इतर स्त्रियांशी असणारे नाते, त्यांचे संघर्ष आणि त्यांच्या प्रेरणा यांचा वेध घेणे या अभ्यासाच्या परिघात आपोआप समाविष्ट होते. स्त्रियांची कविता ही पुरुषांच्या कवितेहून वेगळी ठरते, यामागे असणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक कारणांची चिकित्सा करणे हा या अभ्यासाचा मुख्य गाभा आहे. कोणत्या सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणात स्त्रिया लिहीत आहेत, त्यांच्या कवितेच्या आशयात, काव्यविषयक दृष्टिकोनात, आविष्कारात, शैलीत कसकसे बदल होत आले आहेत आणि मराठीच्या प्रदीर्घ काव्यपरंपरेत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारी स्त्रियांची कविता आज कोणत्या टप्प्यावर उभी आहे याची चिकित्सा करणारा तसेच स्त्रियांच्या कवितेची वैशिष्ट्ये आणि मर्यादा यांचे विश्लेषण करणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या लेखिका डॉ. प्रभा गणोरकर या ख्यातनाम कवयित्री असून मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात मर्मज्ञ टीकाकार म्हणूनही वाचकांना परिचित आहेत. – संपादकीय



Reviews
There are no reviews yet.