Description
आर्थिक विषमतेमुळे तयार होणारे गरिबांचे प्रश्न, माध्यमाच्या विस्फोटामुळे होत चाललेला मानवी मूल्यांचा ऱ्हास, हडेलहप्पीच्या कारभारात अपहृत होत चाललेल्या लोकशाही व्यवस्था आणि सभोवताली चाललेल्या एकूण अडाणी वातावरणामुळे येणारे वैफल्य मांडण्याची एकही संधी राहुल बनसोडेने सोडली नाही. पृथ्वीच्या गाण्यातले सूर हरवू न देण्यासाठी लढल्या जाणाऱ्या राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक लढाईत एक सामान्य सैनिक म्हणून राहुल शेवटपर्यंत लढला. निसर्गाचे आर्त गाण्यातील विलुप्त होत चाललेले सूर वाचविण्याचा राहुलने कसोशीने प्रयत्न केला. लाखो प्रजातींच्या नष्ट होण्याची किंमत चुकवत निसर्ग आपले तुटत चाललेले गाणे अजूनही गातोच आहे. आपण वेळेत निसर्गाचे विलुप्त होणारे हे सूर वाचविले पाहिजेत आणि हीच खरी राहुल बनसोडेला श्रद्धांजली ठरेल.
– प्रशांत पवार











Reviews
There are no reviews yet.