Description
‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ हा आहे कळसाध्याय रावसाहेबांच्या आजवरच्या वैचारिक प्रवासाचा. यात आहे माहितीचा अद्भुत खजिना. दमछाक करणारी वैचारिक घुसळण. या देशाची जडणघडण करणारा एक अस्वस्थ कालखंड. या कालखंडात केंद्रबिंदूकडे विरुद्ध दिशेने जाणारे दोन महामानव एकमेकांचा अंदाज घेत एकमेकांना आव्हान देत एकमेकांना मदत करणारे या दोघांनी हा देश घडवलाय. हे पुस्तक अभ्यासले तर या महामानवांच्या खांद्यावर बसून आपण आपले आजचे प्रश्न समंजसपणे समजावून घेऊ. विनोबा म्हणालेत, मी एक खुजा माणूस; पण मी संतांच्या खांद्यावर बसलोय. त्यांना जे दिसले नाही ते मला आज दिसतंय. तसाच काहीसा प्रत्येकाने अभ्यासावा आणि संदर्भग्रंथ म्हणून घरी ठेवावा असा हा ऐवज. – डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर ज्येष्ठ वैज्ञानिक आणि विचारवंत




Reviews
There are no reviews yet.