“कनातीच्या मागे”

Original price was: ₹450.00.Current price is: ₹380.00.

तमाशाच्या बोर्डावर हलगी – ढोलकी कडाडते. ढोल्या जोशात ढोलकीच्या तोडा वाजवतो आणि गणाला सुरुवात होते. अठरापगड जाती धर्माचे कलाकार तमाशाचा खेळ रंगवायला सुरुवात करतात. मुजरा, हाळीची आणि विनवणीची गवळण, मावशी आणि श्रीकृष्णाचे खटकेबाज संवाद, रंगबाजी, लेक्चर पोवाडा, शिलकार आणि वगनाट्य सादर होते. वगनाट्य संपल्यावर आयुष्यभराच्या वेदनांनी रापलेल्या चेहऱ्याचे कलावंत बोर्डाला नमस्कार करून भैरवी सादर करतात. कनातीच्या आतला हा माहोल तमाशाच्या तंबूच्या आत शिरल्यावरच कळतो ! नेमकं हेच जग श्यामल गरुड यांनी ‘कनातीच्या मागे’ या वृत्तपत्रीय सदर लेखनाच्या माध्यमातून समोर घेऊन येत होत्या. यामुळे पडद्यामागच्या अनेक कलाकारांचे चेहरे प्रसिद्धीच्या थोड्याबहुत प्रकाशात उजळून निघत होते. यात फडमालक, कलावंत, व्यवस्थापक, तंत्रज्ञ, चित्रकार, स्वयंपाकी,…

Description

तमाशाच्या बोर्डावर हलगी – ढोलकी कडाडते. ढोल्या जोशात ढोलकीच्या तोडा वाजवतो आणि गणाला सुरुवात होते. अठरापगड जाती धर्माचे कलाकार तमाशाचा खेळ रंगवायला सुरुवात करतात. मुजरा, हाळीची आणि विनवणीची गवळण, मावशी आणि श्रीकृष्णाचे खटकेबाज संवाद, रंगबाजी, लेक्चर पोवाडा, शिलकार आणि वगनाट्य सादर होते. वगनाट्य संपल्यावर आयुष्यभराच्या वेदनांनी रापलेल्या चेहऱ्याचे कलावंत बोर्डाला नमस्कार करून भैरवी सादर करतात. कनातीच्या आतला हा माहोल तमाशाच्या तंबूच्या आत शिरल्यावरच कळतो ! नेमकं हेच जग श्यामल गरुड यांनी ‘कनातीच्या मागे’ या वृत्तपत्रीय सदर लेखनाच्या माध्यमातून समोर घेऊन येत होत्या. यामुळे पडद्यामागच्या अनेक कलाकारांचे चेहरे प्रसिद्धीच्या थोड्याबहुत प्रकाशात उजळून निघत होते. यात फडमालक, कलावंत, व्यवस्थापक, तंत्रज्ञ, चित्रकार, स्वयंपाकी, बिगारी असे अनेकजण होते. तमाशा बरोबरच संगीतबारीतल्या काही निवडक कलाकारांचाही लेखाजोखा या सदराच्या माध्यमातून मांडला गेला. यासाठी श्यामल गरुड यांनी मिळेल त्या वाहनांनी शेकडो हजार किलोमीटरची भटकंती केली. खेड्यापाड्यातच नव्हे तर अनेक वाडी वस्त्यांवर जाऊन लोककलेच्या जडणघडणीतल्या अदृश्य हातांच्या नोंदी केल्या. यामुळे लोककलेचा हा अस्सल दस्तावेज अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ ठरेल, तर रसिक वाचकांना तमाशा विश्वाची सफर घडवून आणणारा ग्रंथ ठरेल, यात शंका नाही. सुजाण वाचक या पुस्तकाचं निश्चितच स्वागत करतील, याची खात्री आहे. – डॉ. संतोष खेडलेकर (सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

Additional information

Languages

Marathi

Product Type

Printed Copy

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review ““कनातीच्या मागे””

Your email address will not be published. Required fields are marked *

Vendor Information

No product has been found!