डॉ. सविता आंबेडकर “सूर्यप्रभा”

Original price was: ₹400.00.Current price is: ₹340.00.

“डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर” यांच्या जीवनकार्याच्या स्मृति जतन करणारा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ संपादित “सूर्यप्रभा” हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीचा एक महत्वाचा दस्ताऐवज ठरावा. त्याची कारणे अनेक आहेत. त्यापैकी महत्वाचे म्हणजे गेल्या तीन दशकांपासून मराठी पत्रकारीतेत “कलमबाजी” चा ठसा उमटवणारे दिवाकर शेजवळ हे या ग्रंथाचे संपादक आहेत. केवळ पत्रकारच नव्हे तर राजकीय विश्लेषक, सामाजिक प्रश्नांचे आणि लढ्यांचे अभ्यासक ही त्यांची ओळख आणि त्यांनी चळवळीत गेली चार दशके दिलेला सहभाग सर्वश्रुत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, माईसाहेबांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर संशयातून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून अपमानित, एकाकी जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या एका राजकीय षड्यंत्राचे विच्छेदन करणारा हा स्मृतिग्रंथ आहे. आंबेडकरी चळवळीत चैतन्य, ऊर्जा…

Description

“डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर” यांच्या जीवनकार्याच्या स्मृति जतन करणारा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ संपादित “सूर्यप्रभा” हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीचा एक महत्वाचा दस्ताऐवज ठरावा. त्याची कारणे अनेक आहेत. त्यापैकी महत्वाचे म्हणजे गेल्या तीन दशकांपासून मराठी पत्रकारीतेत “कलमबाजी” चा ठसा उमटवणारे दिवाकर शेजवळ हे या ग्रंथाचे संपादक आहेत. केवळ पत्रकारच नव्हे तर राजकीय विश्लेषक, सामाजिक प्रश्नांचे आणि लढ्यांचे अभ्यासक ही त्यांची ओळख आणि त्यांनी चळवळीत गेली चार दशके दिलेला सहभाग सर्वश्रुत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, माईसाहेबांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर संशयातून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून अपमानित, एकाकी जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या एका राजकीय षड्यंत्राचे विच्छेदन करणारा हा स्मृतिग्रंथ आहे. आंबेडकरी चळवळीत चैतन्य, ऊर्जा आणि लढाऊ बाणा जागवणाऱ्या “दलित पॅंथर” स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि माता रमाईंचा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव साजरा होत असताना माईंवरील हा ग्रंथ वाचकांच्या हाती पडत आहे. माई आणि पॅंथर यांच्यातील नाते जगजाहीर आहे. हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा दिवाकर शेजवळ यांचा संकल्प हा त्यांची चळवळीबद्दलची आस्था, अभ्यासू वृत्ती आणि साक्षेपीपणाची प्रचिती देणारा आहे. डॉ. सविता तथा माईसाहेब यांनी आपल्याला किती जपले याची असलेली जाणीव बाबासाहेबांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. माईंनी केलेला त्याग, त्यांची सेवावृत्ती ही बाबासाहेबांना अनेक पातळीवर बळ देणारी ठरली. शेवटी एकच म्हणावेसे वाटते की, रमाई आणि माई साहेब या दोघीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या विशाल आभाळाला पेलणाऱ्या निश्चल खांब होत्या. या स्मृतिग्रंथात नामवंत लेखक, विचारवंतांपासून माईंचा सहवास लाभलेल्या अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिवाकर शेजवळ यांच्यातील साक्षेपी संपादकाने माई साहेबांचे १५ मार्च १९८० रोजीचे भारतीय दलित पॅंथरच्या दिल्लीतील अधिवेशनातील इंग्रजी भाषण, शांतीस्वरूप बौद्ध यांचा मौलिक हिंदी लेख आणि महापरिनिर्वाणाच्या अगोदरचे तीन महिने बाबासाहेबांवर यशस्वी उपचार करणारे औरंगाबादचे फिजिओथेरपिस्ट अहमद हुसेन मशादि यांचा इंग्रजी लेख या ग्रंथात अनुवादित करून समाविष्ट केला आहे. त्यातून माई साहेबांचे विविध पैलू तर समोर येतातच पण त्याने या ग्रंथांचे संदर्भ मूल्यही वाढले आहे. – अर्जुन डांगळे.

Additional information

Languages

Marathi

Product Type

Printed Copy

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. सविता आंबेडकर “सूर्यप्रभा””

Your email address will not be published. Required fields are marked *

Vendor Information

No product has been found!