नाट्य विज्ञान समाजेन : वृत्त आणि विचार

Original price was: ₹300.00.Current price is: ₹250.00.

डॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन क्षेत्रातील एक लक्षणीय रंगकर्मी म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांची पिढी ही सर्वसाधारणतः निरुंद विशेषीकरणासाठी प्रसिद्ध आहे. पण डॉ. हेमू अधिकारी विज्ञानक्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी नोकरी म्हणून त्या क्षेत्राकडे पाहिले नाही. आपल्या देशात विज्ञान हा विशेष अभिजनांचा विषय आहे. पण हेमू अधिकारी यांनी ही मर्यादा ओलांडली आणि ते लोकविज्ञान चळवळीत, अण्वस्त्र विरोधी शांतता चळवळीत सामील झाले. रंगभूमी असो की विज्ञान असो की सामाजिक पर्यावरण असो त्यांचा विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोण प्रखर असणारा स्वभाव सतत आत्मपरिक्षण, अभ्यास करीत राहिला. समाजहितैषी भूमिकेतून योग्य हस्तक्षेप करणे त्यांनी कर्तव्य मानले. या आत्मनिवेदनातून त्यांनी केलेले भंवतालाचे परखड निरीक्षण…

Description

डॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन क्षेत्रातील एक लक्षणीय रंगकर्मी म्हणून आपल्याला परिचित आहेत. त्यांची पिढी ही सर्वसाधारणतः निरुंद विशेषीकरणासाठी प्रसिद्ध आहे. पण डॉ. हेमू अधिकारी विज्ञानक्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी नोकरी म्हणून त्या क्षेत्राकडे पाहिले नाही. आपल्या देशात विज्ञान हा विशेष अभिजनांचा विषय आहे. पण हेमू अधिकारी यांनी ही मर्यादा ओलांडली आणि ते लोकविज्ञान चळवळीत, अण्वस्त्र विरोधी शांतता चळवळीत सामील झाले. रंगभूमी असो की विज्ञान असो की सामाजिक पर्यावरण असो त्यांचा विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोण प्रखर असणारा स्वभाव सतत आत्मपरिक्षण, अभ्यास करीत राहिला. समाजहितैषी भूमिकेतून योग्य हस्तक्षेप करणे त्यांनी कर्तव्य मानले. या आत्मनिवेदनातून त्यांनी केलेले भंवतालाचे परखड निरीक्षण प्रांजळपणे मांडले आहे. त्यांचे मूल्यभान सतत जागे असते. पण सूर मात्र अनाग्रही असतो. अभिनेता म्हणून ते रंगमंचावर ज्या नैसर्गिकपणे वावरत तोच नैसर्गिक सरल भाव त्यांच्या कथनात आहे. कारण सुजनता, माणसाविषयीची आत्मीयता आणि विवेकशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. हे आत्मनिवेदन हा एका प्रांजळ माणसाच्या समकालातील वावराचा दस्तावेज आहे. पुष्पा भावे

Additional information

Languages

Marathi

Product Type

Printed Copy

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “नाट्य विज्ञान समाजेन : वृत्त आणि विचार”

Your email address will not be published. Required fields are marked *

Vendor Information

No product has been found!