Description
१९७०च्या दशकातील मुंबई महानगरीतील कामगारविश्वाची जीवनशैली आणि सांस्कृतिक स्तराचे वैविध्य, हा मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य आणि लक्षवेधी भाग होता. या परिसराने मराठी साहित्यविश्वाला नवे जीवनदर्शन, नवी भाषाशैली, अंतर्मुख आणि अचंबित करणारे अनुभवविश्व प्रदान केले आहे. सुधीर जाधव या नव्या पिढीतील नव्या दमाच्या लेखकानं, चित्रमय शैलीत, अतिशय जोरकसपणे, या परिसरातील रांगड्या आणि नाट्यमय जीवनाचे चित्रण कमालीच्या उत्कटतेनं आणि रसरशीतपणे ‘कामाठीपुरा’ या कादंबरीत केलं आहे. स्वतःच्या जीवनातील अनुभवविश्वाचा, स्फोटक समाजवास्तवाचा, भोवतालला वेढणाऱ्या घटिताचा इतका उत्कंठावर्धक कोलाज क्वचितच वाचायला, आस्वादायला मिळतो. डॉ. मनोहर जाधव







Reviews
There are no reviews yet.