Description
साहिलच्या कथनात व्यक्तीगत किंवा प्रासंगिकता ही अती लघु किंवा काव्यात्मक भाव प्रगटते किंवा भाषिक स्तरांवर प्रतीकात्मकतेचे गुणवैशिष्ट्ये व्यक्त करताना, मुख्यतः तटस्थ न राहता पक्षपाती आहे, तथापि त्यात द्वेष नाहीतर भार्तृभावाची व सौहार्दाची अपेक्षाच तो व्यक्त करतो. जगविख्यात कथाकार सआदत हसन मंटो यांच्या कथाशैलीला समांतर अशी साहिल कबीर यांची कथनशैली आहे. वाचकांच्या मनात तात्काळ अस्वस्थता निर्माण करणे हा त्यांच्या कथनाचा लक्षणीय कल आहे. त्यांच्या लघुकथा / अती-लघुकथा किंवा कविता सदृश्य आशयअविष्कार वाचकांना चकित करतो व विचारप्रवृत करतो. साहिलच्या कथनाची इथे अधिक आन्वीक्षा न करता त्या सामोरे जाणेच अधिक महत्त्वाचे. – डॉ. श्रीधर पवार







Reviews
There are no reviews yet.