Your cart is currently empty!
घन:श्याम तळवटकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र क्रांतीचा वारस
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास वर्षांपूर्वी आपली चळवळ सुरू केली. तिचा सुवर्णमहोत्सव आपण साजरा केला. या पन्नास वर्षांच्या काळात त्यांच्या चळवळीचे स्वरूप वेगवेगळ्या अंगांनी फुलून आले. सामाजिक, राजकीय, धार्मिक चळवळी, अत्याचाराचा प्रतिकार करण्यास सदैव सिद्ध असणारी दलित पँथरची चळवळ, दलित साहित्यिक चळवळ हा बाबासाहेबांच्या चळवळीचाच परिपाक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीच सर्वांची प्रेरणा आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक चळवळींचा वारसा मी आपल्या परीने पुढे चालवत आहे. १९५३ साली त्यांनी मला पी.इ.सो. मध्ये आणले. त्यांचा सहवास मला लाभला. तेव्हापासून आजतागायत मी संस्थेची सेवा करीत आहे. माझ्या जीवनात मोहाचे अनेक प्रसंग आले. मोठमोठ्या मानाच्या व पगाराच्या जागा मजकडे चालून आल्या त्यावेळी…
Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास वर्षांपूर्वी आपली चळवळ सुरू केली. तिचा सुवर्णमहोत्सव आपण साजरा केला. या पन्नास वर्षांच्या काळात त्यांच्या चळवळीचे स्वरूप वेगवेगळ्या अंगांनी फुलून आले. सामाजिक, राजकीय, धार्मिक चळवळी, अत्याचाराचा प्रतिकार करण्यास सदैव सिद्ध असणारी दलित पँथरची चळवळ, दलित साहित्यिक चळवळ हा बाबासाहेबांच्या चळवळीचाच परिपाक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीच सर्वांची प्रेरणा आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक चळवळींचा वारसा मी आपल्या परीने पुढे चालवत आहे.
१९५३ साली त्यांनी मला पी.इ.सो. मध्ये आणले. त्यांचा सहवास मला लाभला. तेव्हापासून आजतागायत मी संस्थेची सेवा करीत आहे. माझ्या जीवनात मोहाचे अनेक प्रसंग आले. मोठमोठ्या मानाच्या व पगाराच्या जागा मजकडे चालून आल्या त्यावेळी आपले तरुण फारसे शिकलेले नव्हते. पण मी ते सर्व मोह टाळले. कारण डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा वारसा चालवावा हेच माझे अंतिम ध्येय आहे व ते ध्येय मी शेवटच्या क्षणापर्यंत जपत राहीन. मला कसलाही मोह होऊ शकणार नाही. माझा मृत देहच आनंद भावनाच्या बाहेर पडेल पण जीवात जीव असेपर्यंत मी बाहेर पडणार नाही.
– घनःश्याम तळवटकर (महाड येथे सत्कार प्रसंगी केलेल्या भाषणातून २५ डिसेंबर १९७७)
Vendor Information
- Address:
- No ratings found yet!












Reviews
There are no reviews yet.