Description
प्रा. रामराव अनिरुद्ध झुंजारे यांनी अनुभवलेलं समाजवास्तव हा या कथासंग्रहातील कथांचा गाभा आहे. जाती-धर्माच्या नावाने, भाषा-प्रांताच्या नावाने कात्रीने कापड फाडावे तसा समाज फाडला जातोय. फाटलेल्या समाजाला जोडण्याची भाषा म्हणजे ‘सकोन’. शांती, संयम, सहिष्णुता, एकात्मता शिकवणारी विज्ञाननिष्ठ कथा ‘सकोन’ मध्ये आहे. मुक्या माणसांची वाणी आणि भुकेल्यांची भाकरी बनून कथांच्या नायिका खंबीरपणे नवं परिवर्तन घडवितात. दलित, उपेक्षित, वंचित आणि पीडित वर्गाला न्याय मिळवून देणाऱ्या आणि परिवर्तनाची लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला विचार देणाऱ्या या कथा आहेत.
आज जगाचा चेहरा बदलून गेलाय, पण घामाचा चेहरा मात्र बदलला नाही. घाम गाळणारा माणूस अजूनही भाकरीसाठी भांडतो आहे. घामाचं पवित्र पाणी आपण आजही उपेक्षितच ठेवलं आहे. क्रांती धर्माच्या, शस्त्राच्या बळावर घडत नसते. नव्या जगात जातीची, धर्माची भाषा चालणार नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची भाषा बोलल्याशिवाय समाजातला भेदाचा अंधकार नाहीसा होणार नाही. प्रा. रामराव अनिरुद्ध झुंजारे यांनी याच मूल्यांचा जयघोष या कथासंग्रहात केलेला आहे. या संग्रहातल्या सगळ्याच कथांना नैसर्गिक सुंदरता लाभली आहे. हेच ‘सकोन’चे मोठे यश आहे.
उद्धव कानडे













Reviews
There are no reviews yet.